जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे दि. २८ फेब्रुवारी, शनिवारी मराठी राजभाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञान, जिज्ञासा आणि भाषाभिमानाचा सुंदर संगम या संयुक्त उत्सवात अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशितोष डोके, शिरोली बुद्रुक कृषी सोसायटीचे माजी संचालक शिवाजी हरिभाऊ डोके, देविदास वाणी, महेंद्र वाणी, माजी केंद्रप्रमुख विठ्ठल डोके साहेब, . मा. खंडू भगत माजी सेंट्रल बॅक अधिकारी .आजीजा इनामदार, अनिल डोके, विकास दुधाळ, सोनाली डोके, मयुर भगत, हर्षदा डोके, अंगणवाडी सेविका प्रियंका डोके, माजी अंगणवाडी सेविका सुलोचना डोके तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रथम प्रभात फेरी व शालेय दिंडी काढण्यात आली. मराठी माझी मायबोली, ज्ञानाची भाषा – मराठी भाषा. अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरण करत मराठी भाषेचा गौरव केला. रिया दुधाळ, श्रृतीडोके, वेदश्री डोके, स्वरा डोके, रुद्र डोके, विराज वाणी, तनुज डोके, साई डोके, अनन्या डोके, पूर्ण डोके, कृष्णा डोके, देवांश डोके, आरुष डोके, आरोही भगत,ईश्वरी शेलार, अथर्व डोके 3 आलिम इनामदार आदी विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले.
निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्वरचित कविता सादरीकरण, अनुभव लेखन आणि प्रश्नमंजुषा या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांना वाव मिळाला. कविवर्य घोडे सरांनी मराठी अभिजात भाषेचा इतिहास व महत्त्व उलगडून सांगत विद्यार्थ्यांमध्ये भाषाभिमान जागवला.
विज्ञानाची किमया : प्रयोगांतून शिकण्याचा आनंद
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोन प्रकट केला. समर्थ वाणी याने ज्वालामुखी प्रयोग, अथर्व डोकेने तरंगणाऱ्या वस्तू, साई ईश्वरी डोकेने साबणाचे तरंग, मानसी वाणीने हवेचा दाब, आरोही भगत हिने ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज, ओवी डोकेने मेणबत्तीचा कागद, देवांश डोकेने पाण्यातील उलटी प्रतिमा, स्वरा डोकेने जड व हलक्या वस्तू यांचे प्रात्यक्षिक सादर केले.
तसेच प्रसाद डोके, नयन डोके, तनुज डोके, विराज वाणी, वेदश्री डोके, प्रिया दुधाळ पर्णवी डोके, विराज डोके तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रयोगात भाग घेतला होता.आदी विद्यार्थ्यांनी हवेचा दाब, तरंगणारे-बुडणारे पदार्थ, पाणी शुद्धीकरण, सूर्यप्रकाश आदी विषयांवर प्रयोग सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
ज्ञान, उत्साह आणि प्रेरणेचा संगम
विद्यार्थ्यांची मनोगते, भाषणे व व्याख्याने यांमुळे कार्यक्रम अधिक समृद्ध झाला. श्याम लोळापोड सरांनी प्रभावी सूत्रसंचालन करत वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत मांडली.
या संयुक्त उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा आणि मराठी भाषेचा अभिमान दृढ झाला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चितच साध्य होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कुमशेत शाळेतील हा संयुक्त उत्सव ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान वृद्धिंगत करणारा ठरला.



Post a Comment
0 Comments