प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण झालेले श्री अमोल कैलास डोके यांचे अकरावी ते टी.वाय. बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे झाले आहे. कठोर परिश्रम, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन,आई वडिलांचा भक्कम असा पाठिंबा तसेच श्री अमोल यांच्या पत्नीचीही त्यांना उत्तम साथ लाभली. दिनांक ०१/०३/२०२६ रोजी लागलेल्या निकालामध्ये श्री.अमोल कैलास डोके हे CA (Chartered Accountant ) परीक्षा पास झाले. त्याच्या या यशाबद्दलत संस्थेच्या वतीने अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
अमोलला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन केले.तसेच महाविद्यालयांमध्ये संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे यांच्या हस्ते श्री.अमोल कैलास डोके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच्या यशाबद्दल अमोलेचे आई वडील व पत्नी यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
उपप्राचार्य डॉ.रविंद्र चौधरी,कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक व उपप्राचार्य प्रा.प्रतिभा लोढा,पर्यवेक्षक प्राध्यापक समीर श्रीमंते,एमसीव्हीसी विभाग प्रमुख नेटके सर,आर्ट्स विभाग प्रमुख प्रा.राजेश शिरपूरकर सर व महाविदयालयातील शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments