प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आंबेगाव तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते जागतिक महिला दिनानिमित्त क्रीडा संकुल मंचर येथे कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष तथा विविध खात्याचे माजी मंत्री आदरणीय दिलीप रावजी वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते जिल्हा परिषद मॉडेल स्कूल प्राथमिक शाळा शिनोलीच्या मुख्याध्यापिका सौ वीणाताई फदाले /सदगीर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आंबेगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी माननीय सौ रुपाली धोका मॅडम व गटविकास अधिकारी माननीय सौ प्रमिला वाळूज मॅडम उपस्थित होत्या विविध खात्याचे अधिकारी, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला उपस्थित होत्या. विनाताई सदगीर यांची जीवनकथा खरोखरच प्रेरणादायी आहे अपंगत्वाला आव्हान देत जिद्दीने शिक्षण घेतले ,नोकरी मिळवली आणि आज त्या एक प्रेरणास्थान आहेत जीवनातील संघर्ष व त्यांनी मिळवले ले यश पाहून खरोखरच आदर वाटतो त्यांना या अगोदर राज्य अपंग पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार कर्तृत्ववान महिला पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्यांचा हा प्रवास स्त्री जातीसाठी एक प्रेरणा आहे जागतिक महिला दिनाच्या दिवशी सन्मान होणे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे असे त्या म्हणाल्या.


Post a Comment
0 Comments