Type Here to Get Search Results !

शिनोली येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न



प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे 

शिनोली ता. २४, शिनोली ता. आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार ता. २३ मार्च रोजी बाल आनंद मेळावा, आठवडे बाजार, खाऊगल्ली सह वार्षिक स्नेहसंमेलन तसेच भव्य लकी ड्रॉ आदी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाल्याची माहिती मुख्याध्यापिका वीणा सदगीर यांनी दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या शीला लोहकरे, पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती प्रवीण पारधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख अंकुश बडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक मधुकर बोऱ्हाडे, हरिचंद्र हिंगणे, प्रवीण पारधी, निलेश बोऱ्हाडे, उपसरपंच गणेश बोऱ्हाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब बोऱ्हाडे, विजय बोऱ्हाडे, किरण ढेरंगे, दिनेश बोऱ्हाडे, गणेश बोऱ्हाडे, पांडुरंग हिंगणे उपस्थित होते. 



शालेय व्यवस्थापन महिला सदस्य सुनंदा करवंदे, सुप्रभा पिंगळे, शीतल बोऱ्हाडे, रेश्मा तांबोळी, प्रियंका डुंबरे मनीषा साबळे, ज्योती बोऱ्हाडे, शिक्षिका शैला रांजणे, सुलोचना बेंढारी, अनिता लांडे, निलेश क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले 

सर्वप्रथम सकाळी महिलांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. त्यानंतर शालेय परिसरात भाजी बाजारात भाजीपाला, फळे, मिठाई, भेळ, खेळण्याची दुकाने यांच्यासह थंड पेय, लिंबू सरबत यासारखी दुकाने थाटली होती. दुपारी सर्वांना रुचकर जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी नृत्ये-गाणी सादर केली. शेवटी आयोजित लकी ड्रॉ मध्ये मिक्सर, फॅन, पैठण्या, शर्ट्स, भिंतीवरील घड्याळे, हातातील घड्याळे, हॉटस्पॉट्स आदी बक्षिसे देण्यात आली. शाळेतील सर्व शिक्षकांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह महिला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गणेश सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकला शिंगाडे यांनी आभार मानले. 


Post a Comment

0 Comments