नारायणगाव | जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा निलायम गार्डन मंगल कार्यालय नारायणगाव ता.जुन्नर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षकनेते संभाजीराव थोरात होते.ज्येष्ठ मराठी साहित्यिक कवी फ.मु शिंदे यांनी आपल्या कवितांतून आईचे महत्त्व व आईविषयीच्या कविता सादर केल्या.
शिवजन्मभूमी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर राज्यस्तरावर मंत्री महोदयांच्या समवेत सकारात्मक चर्चा करून शिक्षकांना फक्त शिकविण्याचेच काम द्यावे अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाबशेठ पारखे,मंगेश अण्णा काकडे,पंचायत समिती जुन्नर सभापती कमलताई शेळकंदे,उपसभापती अमित ढोले,पंचायत समिती सदस्य सुषमा वाव्हळ,संजय वऱ्हाडी,संभाजीराव चव्हाण,शांताराम दाते,राजेंद्र पिंगट,गटनेते जयसिंग पोटे,पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे,विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर,शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख योगेश पाटे,सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर,गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे,शिक्षक संघ राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे,साने गुरुजी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे,तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे,राज्य प्रतिनिधी साहेबराव मांडवे,विकास मटाले,भरत बोचरे,जिल्हा प्रतिनिधी रामदास संभेराव,सुनिल हाडवळे,गणेश ढमाले,नानाभाऊ कणसे,संतोष पानसरे,माजी अध्यक्ष रविंद्र वाजगे,उपेंद्र डुंबरे,विठ्ठल तांबे, पतसंस्थेचे सभापती सचिन मुळे व पतसंस्थेचे सर्व संचालक,कवी संदिप वाघोले आदि मान्यवर व शिक्षक संघाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे यांनी तीन वर्ष केलेल्या शिक्षक संघाच्या कार्याचा आलेख मांडत शिक्षक संघ शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचे काम करत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाने केलेल्या कार्याचा गुणगौरव करत जुन्नरचे योगदान हे संघटनेमध्ये महत्त्वाचे असून प्रेरणा पुरस्कार खऱ्या अर्थाने शिक्षकांना शैक्षणिक वाटचालीस महत्त्वपूर्ण योगदान देणाराआहे.शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात प्रसंगी न्यायालय मार्गाने लढा देण्याचे काम शिक्षक संघ करेल असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडणारी राज्यातील अग्रगण्य संघटना असून जुन्नर तालुका संघ या शाखेने सुरू केलेला प्रेरणा पुरस्कार उपक्रम निश्चितपणे राज्यात आदर्शवत आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ हा येणाऱ्या काळात बीएलओ व इतर अशैक्षणिक कामांच्या विरोधात मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
मान्यवरांच्या शुभहस्ते जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ डायरीचे प्रकाशन करण्यात आले.सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांच्यासह ३ केंद्रप्रमुख,२ मुख्याध्यापक,६ पदवीधर शिक्षक,८१ उपशिक्षक व १ विषय शिक्षक यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्काराने फेटा बांधून तसेच सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्रक,शाल व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडी अध्यक्षा शुभदा गाढवे यांनी केले.सूत्रसंचलन शिक्षक पतसंस्था संचालिका सुनिता वामन व तालुका शिक्षक संघ सरचिटणीस प्रभाकर दिघे यांनी केले तर आभार तालुका संपर्कप्रमुख संदिप शिंदे यांनी मानले.



Post a Comment
0 Comments