Type Here to Get Search Results !

शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत यशवंत घोडे सरांची उल्लेखनीय कामगिरी; पुस्तक समीक्षेत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक

 


पुणे जिल्हा परिषद, पुणे शिक्षण विभाग (प्राथमिक) आयोजित शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा २०२५–२०२६ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील उपक्रमशील शिक्षक यशवंत मारुती घोडे यांनी “पुस्तक समीक्षा” या स्पर्धेत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

 ही स्पर्धा जि. प. प्राथमिक शाळा, धानोरे (ता. खेड, जि. पुणे) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते घोडे सरांचा सन्मान करण्यात आला.



या स्पर्धेमध्ये शिक्षक-शिक्षिकांसाठी विविध कौशल्याधारित स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये वक्तृत्व, निबंध, १०० मीटर धावणे, रांगोळी, गीतगायन, क्रिकेट, प्रश्नमंजुषा, शैक्षणिक साहित्य निर्मिती, व्हिडिओ निर्मिती, फलक लेखन, स्वरचित कविता गायन, कथाकथन, चित्रकला, पोवाडा गायन, पुस्तक समीक्षा तसेच कागदकाम (कार्यानुभव) अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमुळे शिक्षकांच्या सर्वांगीण कौशल्यांना व्यासपीठ मिळाले.



या स्पर्धेस पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, मुळशी, मावळ, भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांतील स्पर्धक उपस्थित होते.

या प्रसंगी खेड तालुका गटशिक्षणाधिकारी मा. अमोल जंगले साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. जीवन कोकणे साहेब, मा. सौ. अनिता शिंदे मॅडम तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.



या यशामागे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. संजय नाईकडे साहेब, तसेच जुन्नर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी मा. अशोक लांडे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. विष्णू धोंडगे साहेब व केंद्रप्रमुख मा. कमलाकांत मुंढे साहेब यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

घोडे सरांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, कवी-लेखक, साहित्यिक मित्रपरिवार, शालेय व्यवस्थापन समिती (कुमशेत) अध्यक्ष व सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार, फोफसंडी येथील नोकरदार वर्ग, बिरसा कॉलनी आदिम मंडळ (बारव) तसेच विविध संघटनांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments