प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर : चिंचोली येथील प्रा शरीफ महेमूद चौगुले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील ‘व्यवसाय प्रशासन’ या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे . आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयात त्यांनी सहा प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. सध्या ते मालेगाव जि. नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. चौगुले यांनी ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले आहे. त्यांना संशोधनासाठी नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व वाणिज्य संशोधन केंद्राचे डॉ जे पी भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने जिद्द व परिश्रमाच्या जोरावर मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून चिंचोली गावासह मित्रपरिवारानी चौगुले यांचे विशेष अभिनंदन केले आहे .

Post a Comment
0 Comments