Type Here to Get Search Results !

समर्थ मध्ये कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न...



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे विद्यार्थी विकास मंडळ व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातील १०० विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्सचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,डॉ.शरद पारखे उपस्थित होते. 

या कार्यशाळेस युवराज सचिन पोंडकुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाटा अनालिसिस व एआय(AI) टूल्स या विषयावर कौशल्य आत्मसात करण्याचे मार्गदर्शन केले. कच्च्या माहितीवर प्रक्रिया करून त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष काढणे. याद्वारे व्यवसायांना भविष्यातील निर्णय घेण्यास मदत होते. एआय (AI) मुळे आता हे काम अत्यंत वेगाने आणि अचूकपणे करणे शक्य झाले आहे. कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून संवादकौशल्य, नेतृत्वगुण, वेळेचे योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची जोड आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जात सातत्याने स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला.प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.गणेश बोरचटे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments