Type Here to Get Search Results !

घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील सहा नंबर वार्ड मधील ग्रामपंचायत यांनी लेखी पत्र व्यवहार करून देखील जुगार अड्डा चालूच? यामध्ये राजकीय व्यक्तीची भागीदारी असल्यामुळे कारवाई होताना दिसत नाही



घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे 

घोडेगाव- घोडेगाव हे आंबेगाव तालुक्याचे मुख्य गाव असल्याने या गावामध्ये सर्व सरकारी कार्यालय आहेत तहसील कार्यालय व न्यायालयाच्या अर्धा किलो मीटर अंतरावर अवैध जुगार अड्डा चालू असून घोडेगाव ग्रामपंचायत यांनी लेखी स्वरूपात याबाबत प्रशासनास कळवले असून सुद्धा या जुगार अड्ड्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहेत मंचर घोडेगाव रस्त्यालगत हा जुगार अड्डा चालू असल्याने रस्त्याने ये जा करणाऱ्या महिलांना तसेच नागरिकांना या जुगारू लोकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास चे नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासन मात्र पाहण्याच्या भूमिकेत दिसत आहेत अशी नागरिकांमध्ये चर्चा दिसून येत आहे जुगार, मटक्यामुळे दहशतीचे वातावरण पोलिस ठाणे हद्दीत असून खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्डे, मटका आणि यामुळे युवक व्यसनाच्या गर्तेत अडकत असून अनेक कुटुंबे उध्दवस्त होत आहेत. तर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवैध दारू पिणा-या टोळ्यांमुळे भांडणे, मारामाऱ्या, कौंटुंबिक हिंसाचार, चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला. घोडेगाव सहा नंबर वार्ड मधील मंचर घोडेगाव रस्त्या लगत जुगार अड्डा चालू असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे तरी देखील यावर कारवाई होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले प्रशासन कोणत्या दबावाला बळी पडत आहे का कोणी राजकीय पुढारी या जुगार अड्ड्याला भागीदारी आहे का ?त्यामुळे प्रशासन कारवाई करत नाही का ?



का कुणाच्या दबावाखाली कारवाईच करायची नाही? इतके स्पष्टपणे अवैध धंदे सुरू असताना पोलिस प्रशासन कारवाई का करत नाही? कोणाच्या दबावाखाली ही कारवाई रोखली जात आहे का? या धंदयांमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तिंना अभय मिळत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Post a Comment

0 Comments