Type Here to Get Search Results !

जीएमआरटी खोडद येथील राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात शिव छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर 

जुन्नर :जी एम आर टी खोडद येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नरच्या इयत्ता अकरावी सायन्सचे विद्यार्थी कु सर्वज्ञ बनसोडे व कु प्राची पवार यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयामध्ये संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ महादेव वाघमारे,उपप्राचार्य डॉ रवींद्र चौधरी, कनिष्ठ महाविदयालयाच्या समन्वयक व उपप्राचार्या प्रा प्रतिभा लोढा,पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.



याप्रसंगी एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा कुंडलिक नेटके व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या यशाबद्दल कु सर्वज्ञ बनसोडे व कु प्राची पवार यांचे महाविद्यालयाच्या वतीने व सर्व प्राध्यापक तसेच जुन्नर तालुक्यातून या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments