प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थिनी मंच विभागाच्या वतीने आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बनवलेल्या 'भारताच्या सुवर्णकन्या' या हस्तलिखिताचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थिनी मंच प्रमुख प्रा.डॉ.वर्षा देसाई यांनी आपल्या मनोगतातून वैदिक काळापासून आधुनिक स्त्रीपर्यंतचा इतिहास मांडला.बदललेल्या जीवनशैलीमध्ये स्त्रीने घर आणि ऑफिस सोबत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादनही त्यांनी केले. महाविदयालयाच्या प्रबंधक सौ मनीषा कोरे यांनी स्त्रियांनी नेहमी नवीन काहीतरी सर्जनशील निर्मिती करत रहा असे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी महिला प्राध्यापकांनी ओव्या आणि गाण्यांचे ही गायन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. डॉ महादेव वाघमारे यांनी हस्तपुस्तिका लेखनाबद्दल विभागाचे आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन आणि कौतुक केले असे आगळे वेगळे उपक्रम दरवर्षी होत राहिले पाहिजेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्त्री ही सर्जनशील आहे ती कमजोर नाही स्त्रीने प्राचीन काळात राज्यकारभार ही सांभाळला आहे. मग त्या इतिहासाची पुनरावृत्ती करत आता ही स्त्रियांनी नवीन उर्जेने नवीन विचारांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर कला शाखाप्रमुख डॉ.अभिजीत पाटील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.सतीश जाधव,आणि विद्यार्थिनी मंचाचे सर्व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रतिक्षा सुकाळे यांनी केले,सूत्रसंचालन प्रा.रेखा गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.डॉ.सुप्रिया काळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक सर्व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments