चारोळ्या
सुखास काय रे कमी ?
तरी तो कमावू पाहतो
दुःख बिचारा आपला
आहे त्यात भागवतो
सुखाचं काय सांगता ?
आपल्याच जगी चूर
दुःखाचं जीणं सांगतं
माणूस जन्माचं सार
जे आपल्याला दिसतं
ते कधी खरं नसतं
खरं सत्य तेच आहे -
सदा लपविलं जातं
चुकत चुकतच ना -
माणूस शिकत जातो
असा माणूस आहे कां-
न शिकता पुढे जातो ?
शिक्षितच सुशिक्षित -
असं कां म्हणावं कुणी ?
अशिक्षित वाटे कधी -
शिक्षिताहूनही गुणी
कवी - सूर्यांबिका , सोलापूर
( सूर्यकांत ना. कामून )
मो.नं.07620540722

Post a Comment
0 Comments