Type Here to Get Search Results !

आदिवासी मुलींनी घेतले स्वच्छता आणि स्व-संरक्षणाचे धडे.

 


प्रतिनिधी जुन्नर : प्रा. प्रविण ताजणे ( सर )

आज बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी आदिवासी व दुर्गम भागातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सोनावळे (ता.जुन्नर) येथील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने किशोरवयीन मुली मानसिक आरोग्य,शारीरिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता व स्व-संरक्षण जनजागृती अभियानांतर्गत *"कळी उमलताना"* हा कार्यक्रम घेण्यात आला.



यावेळी डॉ.शुभांगी वलवनकर यांनी मुलींना शारीरिक आरोग्य ,वयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीच्या काळात घ्यावयची काळजी,पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड चा वापर,याबाबत मुलींना मार्गदर्शन  केले.



तर डॉ.एफ.बी.आतार यांनी मुलींचे हक्क,सुरक्षा, स्वसंरक्षण व मानसिक आरोग्य याबत  मुलींना मार्गदर्शन केले.तसेच चांगले मित्र जोडा, मोबाईल चा योग्य वापर करा,आई वडिलांचा सन्मान होईल असेच वर्तन करा असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी मुलींना दिला.

डिसेंट फाउंडेशनने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पंचवीस हजार किशोरवयीन मुलींपर्यंत हा उपक्रम पोहोचवला असून, त्यांना मोफत पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड व "कळी उमलताना" या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप केले आहे.



याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,संचालक आदिनाथ चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर लोखंडे,अधीक्षक एच.बी.गेगजे,स्त्री अधिक्षिका योगिता वळवी, समन्वयक योगेश वाघचौरे , शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोळे सर यांनी केले तर आभार सोनवणे सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments