Type Here to Get Search Results !

जुन्नर ते कारखाना फाटा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा वृक्षारोपण करु....!!- वंचित बहुजन आघाडीची मागणी

 


जुन्नर ते कारखाना फाटा हा रस्ता जुन्नर शहर ते शिरोली विविध कार्यकारी सोसायटी दरम्यान अत्यंत खराब झाला असून, रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनांना प्रवास करताना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, त्यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये या रस्त्यावर प्रवास करणे जिकिरीचे आणि धोक्याचे होवून बसले आहे. त्यामुळे हा रस्ता ताबडतोप दुरुस्त करावा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, जुन्नर येथे उपअभियंता यांना दिनांक २५/०९/२०२४ रोजी देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. दिनांक ०३/१०/२०२४ पर्यंत हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही तर या रस्त्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कर्मचारी श्री. सांगडे यांनी निवेदन स्विकारले असून लवकर काम चालू होईल असे आश्वासन दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप,युवक अध्यक्ष महेश पठारे, जुन्नर तालुका सचिव राहुल धोत्रे, सूर्य क्रांती प्रतिष्ठान जुन्नर तालुकाचे संस्थापक/ अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य चेतनशेठ साळवे, जुन्नर तालुका युवक महासचिव सागर साळवे, प्रदिप दप्तरे,अजय भाईक,मनोज कांबळे, ई. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments