मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय ,भोसरी, पुणे यांच्या वतीने नाणेघाट येथील प्राचीन आद्य शिलालेखास भेट दिली आहे. त्यातून मराठी भाषा किती प्राचीन आहे. हे आपल्याला कळते. हा संदर्भ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग झाला आहे.
यावेळी नक्षत्र गौरव पुरस्कार कवी ज्ञानेश्वर काजळे यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आला. अनेक पर्यटक व मराठी भाषा प्रेमी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौखिकता जोपर्यंत आपल्या भाषेची आहे .तोपर्यंत ती भाषा जिवंत आहे. आपल्याला भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजे. आपल्या पिढ्यांना आपल्या कुटुंबातून मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त होणे आवश्यक आहे. तरच त्या भाषेचा दर्जा सुधारू शकतो. जास्तीत जास्त या भाषेचा वापर व त्यात दिलेल्या साहित्याचं मोठ्या स्वरूपात इतर भाषेत भाषांतर होणे आवश्यक आहे.
मराठी भाषेचा स्वाभिमान म्हणून आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे या ठिकाणी जाऊन प्राचीन आद्य शिलालेखास अभिवादन करण्यासाठी सर्व नक्षत्र कवी बालाजी थोरात, कवी यशवंत घोडे, कवी ज्ञानेश्वर काजळे, पोलीस कवी विनायक विधाटे, संपत नायकोडी, कवी वादळ कार, पुणे इत्यादींनी अभिलेखास अभिवादन करण्यासाठी जाऊन ..माय मराठीचा जागर करण्याचा प्रयत्न केला .
मराठी भाषा, जिवंत ठेवणे आणि तिचा विकास करणे. तसेच तिच्या वाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे. ही मराठी माणसाची आवश्यकता आहे .मराठी भाषेची आवश्यकता आहे. रोजच्या वापरामध्ये मराठीचा वापर जास्तीत जास्त करावा. अशा प्रकारची भावना यानिमित्त कवी वादळकार , पुणे यांनी व्यक्त केली.
जय महाराष्ट्र, जय कविता, जय मराठी, जय नक्षत्र अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या. नक्षत्राचं देणं काव्यमंच गेले पंचवीस वर्षे काव्य क्षेत्रात बरी असे कार्य करत आहे. अनेकांना या व्यासपीठांनी घडवले आहे .अनेकांना व्यासपीठ विनामूल्य उपलब्ध झाले आहे. मराठी माणसाची अस्मिता जपण्याचं काम काव्यमंचने अनेक वर्ष केले आहे. अशी माहिती एका निवेदनाद्वारे प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी दिली.
Post a Comment
0 Comments