Type Here to Get Search Results !

श्री शिव छत्रपती महाविद्यालयात संभाषण कौशल्य व रोजगाराच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न....



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )

वक्तृत्व कला, संभाषण कला ही चौसष्ट कलांचा राजा मानली जाते. - प्रा.डॉ.शाकुराव कोरडे शब्दसृष्टी अकॅडमी ,जांबुत

जुन्नर. श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील  वादविवाद व वक्तृत्व मंडळ विभागाच्या वतीने  वादविवाद व वक्तृत्व मंडळ  विभागाचे  उद्घाटन व  'संभाषण कौशल्य व रोजगाराचा संधी' या विषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे यांनी दिली आहे.



या कार्यशाळेचे उद्धघाटन अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी सर यांच्या वतीने संपन्न झाल्याची घोषणा कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ महादेव वाघमारे यांनी केली. कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन प्रा. डॉ.शाकुराव कोरडे संस्थापक शब्दसृष्टी अकॅडमी जांबुत शिरूर,प्रा.रतिलाल बाबेल नारायणगाव, प्रा मुक्ता गाडेकर बेल्हा,प्रा.वैशाली सावंत जुन्नर इ. मान्यवर उपस्थित होते. 



या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात बोलताना डॉ.कोरडे म्हणाले की

वक्तृत्व ही कला अवगत करायची असेल तर पहिले स्वतःवर  प्रेम करणे गरजेचे आहे.बोलणे सकारात्मक असेल पाहिजे. स्तुति अदृश्य अप्सरा आहे. बोलण्याची कला असेल तर आपण जगावर राज्य करू शकतो.या कार्यशाळेच्या दरम्यान त्यांनी काही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात संभाषण कलेचे उत्कृष्ट धडे दिले.



मा.प्राचार्य डॉ.एम.बी. वाघमारे सरांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थी कुठेही कमी पडू नये. इतरांशी संवाद साधताना आपल्या शब्दावर,भाषेवर प्रभुत्व असणे खूप महत्वाचे आहे,तसेच आपल्या शब्दफेकीत इतकी ताकद असली पाहिजे की दुसऱ्यांच्या मनात ते विचार भावना आत्मीयता खोलवर रुजली पाहिजे असे प्रतिपादन केले.



या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात श्री.रतीलाल बाबेल सरांनी विदयार्थ्यांना उत्कृष्ट उदाहरण देऊन तुमचे संवाद कौशल्य कसे विकसित करू शकता त्यासाठी वाचन खूप महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले.संत कबीर यांचे दोहे,रहीमचे दोहे यांचे उदाहरण देऊन विषयाची रंगत वाढवली .



सौ.मुक्ता गाडेकर मॅडम यांनी आपल्या उत्कृष्ट वक्तव्यातून कष्ट करण्याची तयारी व संभाषण चांगले असेल तर विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.स्वतःला प्रेझेंट करता आले पाहिजे.व पेशंस असणे खूप गरजेचं असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यशाळेच्या शेवटच्या भागात प्रा.सौ.वैशाली सावंत यांनी संभाषण कौशल्य,देहबोली व भाषा खूप महत्वपूर्ण असते. बोलण्याचे प्रकार आपल्या व्यक्तिमत्वात भर टाकत असते. काही आवाज व हावभाव करून दाखवून त्यांनी वक्ता बनण्यास काही गोष्टी महत्वपूर्ण असतात हे सांगितले. 

 या कार्यशाळेच्या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक व उपप्राचार्या प्रा.पी एस लोढा मॅडम,पर्यवेक्षक प्रा.एस. ए.श्रीमंते,एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके,वरिष्ठ महाविद्यालयातील कला विभाग प्रमुख डॉ.ए.एस.पाटील,तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.या कार्यशाळेचे प्रास्ताविक वरिष्ठ  महाविद्यालयातील

वादविवाद व वक्तृत्व मंडळाचे प्रमुख प्रा.एस.एन.कसबे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.एस. बी.गवळी,सूत्रसंचालन प्रा.सौ.व्ही.व्ही.फुलसुंदर व कनिष्ठ महाविद्यालयातील वादविवाद व वक्तृत्व मंडळाच्या प्रमुख प्रा.एस.डी.सोनार,आभार प्रदर्शन प्रा.के.के. शिंदे यांनी केले.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी या विभागातील सर्वच सदस्य प्राध्यापकांनी सहकार्य केले.

या कार्यशाळेकरिता वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments