आधुनिक कालखंडात जसजसा विकास झपाट्याने होत गेला , तसतशा वेगवेगळ्या समस्या ही वाढत गेल्या. मानसिक ताणतणाव ही त्यातलीच एक मुख्य समस्या आहे. एक पूर्वीचा कालखंड लक्षात घेता,शारीरिक कष्टाची कामे ही स्त्री पुरुषांसाठी जास्त होती. नैसर्गिक वातावरण पोषक घरगुती आहार यामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य तंदुरुस्त होते. परंतु आज आपल्याला सगळ्या गोष्टी लवकरात लवकर हव्या असण्याची सवय झाली आहे. त्यामध्ये मग अपवाद वेगवेगळे आधुनिक उपकरणांची भर पडलेली असावी. माणसाला वेळ वाचवण्याची सवय लागली. यातून च तो मेहनतीची कामे टाळू लागला.जो तो पैशांच्या मागे धावू लागला. गावाचे रुपांतर शहरात झाले.एकत्र कुटुंब विभक्त होताना दिसू लागली. नवरा बायको आणि फार फार झालेच ते एक अपत्य. अस कुटुंब भाड्याच्या खोलीत कमी आणि ऑफिस मध्ये जास्त राहत. कामाचा असणारा प्रचंड व्याप यातून हळूहळू डिजिटल प्लॅटफॉर्म खाली बारा बारा ते पंधरा पंधरा तास घालवून मानसिक तणाव , पुरेशी निद्रा न होणे, चिंता यांसारख्या समस्या उद्भवतात. मुलांकडे पाहायला आईवडिलांना वेळ नाही. आईवडील ऑफिसात तर मुल एकट कुठ काय करत असत अभ्यास करतो का नाही,कुठे जातो,काहीच त्यांना ठाव नसते. आईवडील ऑफिसात गेल्यावर कुठे एखाद लहान मूल एकट रूमला कुलूप असत. अन् ते गॅलरीत बाहेर कोंडून ठेवल्यासारखे खेळत बसले असत.
जसजशी मुले मोठी होऊ लागतात, तसतसा त्यांच्यात वडील आई यांच्यातील संवाद कमी झाल्याने न भांडण होत न काही प्रेमळ संवाद. कारण इथे संवाद होतो तो फक्त कागदोपत्री चिठ्ठी द्वारे मुल घरात असते तेव्हा आईवडील गजरात नसतात. आणि ते येत पर्यंत मुल झोपी गेलेल असत.
यामुळं मुल एकटी पडतात. त्यांना त्यांचं मन मोकळं सांगावं असं कुणीच नसत. मित्रांच्या वाईट संगतीत मुले व्यसनाधीन ,लैंगिक दृष्ट्या शोषणास बळी पडतात. अन् ही गोष्ट घरापर्यंत गेल्यावर मुलांना समुपदेशन करण्याऐवजी नवरा बायकोच भांडण होत. मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन गुन्ह्याच्या जाळ्यातून त्यांना लवकर बाहेर काढले नाही तर त्यांना त्याची सवय होऊन जाते. एक वेळ अशी येते की ,हे वाईट मार्ग त्यांच्याच जीवाचे बळी घेतात, किंवा थकून आत्महत्यासारख्या गोष्टी करतात. म्हणतात ना जर मरणाच्या दारात असलेला व्यक्ती जर त्याच्याकडे जगण्याची इच्छाशक्ती असेल तर तो त्या मरणाच्या दारातूनही पुन्हा माघारी येऊ शकतो, जर त्याच्याकडे जगण्याची मनस्थिती नसेल तर त्याचा मृत्यू होणे निश्चित असते. मग त्याला डॉक्टर देखील वाचवू शकत नाही. म्हणूनच मुलांचे मानसिक आरोग्य समुपदेशन हा खूप गरजेचा आणि महत्वाचा भाग आहे.
मानसिक ताणतणाव बऱ्याचदा स्त्रियांमध्ये जास्त पहावयास मिळतो. ७५% महिलांचे प्रमाण असेल की, ज्यांना मानसिक आधार मिळणे गरजेचे असते. यासाठीच आपापसात संवाद होणे हा खूप महत्वाचा भाग आहे. जर आपल्याला कुणी एखादी व्यक्ती मनमोकळेपणाने काही सांगू इच्छित असेल तर ,तिचे म्हणणे ऐकून घेणे ही गरजेचं असत. कदाचित आपल्या ऐकून घेण्याने आपण मार्ग देऊ शकू वा ना देऊ शकू पण त्यातून त्या व्यक्तीचे मन मोकळे नक्की होते,कदाचित ती चुकीचं पाऊल टाकण्यापासून वाचू शकते. तिचे मतपरिवर्तन होऊ शकते. मानव स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनाच मानसिक आधाराची गरज ही असते.
एक अल्पवयीन मुलगी घरात तिची शैक्षणिक असो मानसिक असो अशी विचारपूस केली जात नाही. शिक्षणात ही ती फार हुशार असते. शिक्षण घेणं आणि काम करणे एवढच तिच्या मनावर बिंबवल जात. ज्या घरात लैंगिकतेवर बोलण देखील पाप समजल जात. कधीच मुलांशी बोलू नये.ह्याच मुलांवर मग जेव्हा असे प्रसंग उद्भवतात, यातून कसा मार्ग काढायचा याच शिक्षण ना घरात दिलं जात ना शाळा,महाविद्यालयात दिलं जातं. तीच मुलगी इतकी तणावात जाते की ,तिला समजून घेणार कुणीच भेटत नाही. घरात ही सतत वादाचे वातावरण असल्याने तिला सार काही नकोस वाटत. तेव्हा ती मानसिक रित्या कमजोर ,विचारांचे चक्रव्यूह सतत घुटमळत असत. अशा मुलांवर उपचार न झाल्याने एकतर ती वेडी होतात. किंवा मग आत्महत्या सारख्या भयानक कृत्यास बळी पडतात. यासाठी प्रथमतः पालकांनी मुलांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. मुलांच्या कलागुणांना वाव द्यायला हवा.त्यांच्याशी मैत्रीचे नाते ठेऊन सगळ्या गोष्टी बोलल्या जायला हव्या. संस्कारांचे बीज पेरले पाहिजे. तरच कुठे ही स्थिती सुधारू शकेल.
एक वास्तव सांगायचं झालं तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नाही. मुलांना कठोर अनुशासन लादून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा मुलांच्या मनापेक्षा कोण काय बोलेल, समाजात असणारी प्रतिष्ठा महत्वाची असते. मुलांच्या आणि पालकांत तेढ निर्माण होऊन यातून जीवन संपवण्यापर्यंत प्रकार घडतात. जसजसे जगण्याचा कल बदलत आहे. मुलगा मुलगी समान तत्व येत आहे , तसेच मुलांच्या आवडीनिवडी जोपासणे, त्यांना समजून घेणे हे तितकंच महत्वाचं असत.
कधी कधी व्यक्ती इतकी हतबल असते, विशेषतः पुरुष ज्यांना कधी परिवाराचा सहवास लाभलेला नसतो ,ना कुणाचा जीवनात आधार असतो. तरी ही अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील एखादी व्यक्ती आपले साम्राज्य समाजात ओळख नावलौकिक खिशात दमडी नसताना आपल स्वतःच अस्तित्व निर्माण करते. तिच्या स्वभावानं तिच्या आवाजातल्या मधुर प्रेमाने मन जिंकत असते. कधीच कुठल्या असणाऱ्या पदाचा गर्व न करता स्वतःच सरळ साधं जीवन जगत असते. अन् अशा वेळी विरोधकांचा ही प्रचंड विरोध होत असतो. तेव्हा ते जीवन किती धाकधुकीच वाटत असेल. समाजात प्रतिष्ठा मिळवणे देखील धोक्याची च लक्षण म्हणावं लागतील. अशा वेळी त्यांना देखील मानसिक पाठबळ देणं खूप गरजेचं असत.
एक खर म्हटल तर , संपूर्ण अभ्यास करता महिलांपेक्षा पुरुषांमध्ये सहन करण्याची एखादा निर्णय संपूर्ण विचार करून पार्श्वभूमी पडताळून घेण्याची वृत्ती जास्त असते. आणि आजकाल हेच गरजेचं आहे. आपला प्रेमाचा एक शब्द एक शब्द ही बराचसा ताण दूर करतो. म्हणून पहिले लक्ष आरोग्य आणि मानसिकतेकडे देणे गरजेचे आहे.
बरेचदा आपण काम करताना कामाकडे आर्थिक दृष्ट्या पाहतो. यात मग आपली आवड असू नसू पर्याय किंवा वेतन हव्यास म्हणून पाहतो. पण यात आपल्या आवडीनिवडी यांचा गळा दाबला जातो, हा विचार आपण करतच नाही. जेव्हा आपण प्रत्येक लहान मुलापासून तर प्रौढ व्यक्तीपर्यंत आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊ ,जेव्हा आपण एकमेकांना आधार देऊ, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होऊन स्वतःचा खरा आनंद शोधू तेव्हाच आपले जीवन आपल्याला तणावमुक्त व हवेहवेसे वाटणारे असेल.
मानसिक तणाव विशेषतः गर्भवती महिलांसाठी अपायकारक असतो. गरोदर स्त्रीला मानसिक शारीरिकरित्या
सुदृढ राहणे खूप आवश्यक असते. याचा परिणाम थेट गर्भाशयात असणाऱ्या अर्भकावर होत असतो. अपत्याची गर्भाशयात वाढ होत असताना आईच्या सर्व हालचाली व गुणांना ते अनुभवत असत. जर आईने चांगली गोष्टीची पुस्तके वाचली तर त्याचा सकारात्मक प्रभाव बालकावर पडतो. पण जर मानसिक रित्या कमजोर असलेली स्त्री, व्यसन करणारी स्त्री असेल तर ती निरोगी बालकास जन्म देऊ शकत नाही. अशावेळी योग्य आहार मानसिक समुपदेशन आणि अशावेळी तणाव मुक्त राहून मन सकारात्मक असणे खूप महत्वाचं असते. बरेचदा सुखसुविधा उपलब्ध झाल्याने गरोदर स्त्रिया शरीराची हालचाल कमी करतात. मानसिक स्वास्थ्य त्यांचं संतुलित न राहिल्याने स्त्रीच्या जीवितास व अपत्याच्या जीवितास ही धोका निर्माण होतो. या दुःखात ही स्त्रिया जातात. त्यामुळे त्यांना यातून बाहेर काढण गरजेचं असत. यासाठी मानसशास्त्र समुपदेशन करणाऱ्याची गरज असते.
खरेतर शारीरिक मानसिकतेवर मनुष्य जीवन अवलंबून असत. जसे विज्ञान शारीरिक दृष्ट्या महत्वाचे असते, तसेच मानसिक दृष्ट्या मानसशास्त्राचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते. आज आपण पाहतो की जिकडे तिकडे मानसिकतेने त्रस्त लोक भेटतात. हे प्रमाण जास्तीत जास्त शहरात जास्त अधलून येते. पाहायला गेलं तर फार कमी लोक असतील जे त्यांचं जीवन आवडीनुसार आनंदाने जगतात. जीवन हे आयुष्याचं पान एकदाच लिहिलं जात ,त्यात काय लिहावं दुःख की सुख? हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. आपण मात्र नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार करतो. जर पाहायला गेलं तर आपण दुःखात ही सुख शोधू शकतो. इतकी क्षमता आपल्यात नक्कीच आहे. आणि नकारात्मक गोष्टींमुळे जास्त मानसिक ताणतणाव सारख्या समस्या वाढल्या आहेत. मानसिक ताणतणावाचे काय ? हा प्रश्न सुटणं कठीण जातं.
लेखिका - सौ. शितल सतिश शिंदे
Post a Comment
0 Comments