प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
मंगळवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे वाड्.मय मंडळ विभागाच्या उद्घाटनाप्रसंगी कवी आपल्या भेटीला हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मा. सौ सरिता कलढोणे या सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एम.बी.वाघमारे सर हे होते.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सरिता कलढोणे यांनी त्यांच्या निवडक स्वरचित कविता सादर केल्या. वाङ् मय हे जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहे हे पटवून देताना काही उदाहरणे व दाखले त्यांनी आपल्या मनोगतामधून मांडले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे सर यांनी त्यांच्या मनोगतून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच ग्रंथालयामध्ये वेळोवेळी जाऊन विविध पुस्तके आपण वाचली पाहिजेत असे प्रतिपादन केले. वाङ् मय आणि इतिहास यांचा सहसंबंध देखील त्यांनी आपल्या मनोगतामधून स्पष्ट केला.तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाप्रसंगी सौ. सरिता कलढोणे यांनी श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या ग्रंथालयास त्यांचे स्वलिखित "शब्दांच्या गाभाऱ्यात" हे पुस्तक भेट म्हणून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक या विभागाचे विभाग प्रमुख प्रा. गणेश रोकडे सर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.एस. के.कोकणे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सौ.मीरा हाडवळे यांनी केले तसेच आभार प्रा. पी.बी.शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.डी.चौधरी सर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा. श्रीमती लोढा मॅडम,पर्यवेक्षक प्रा. श्रीमंते सर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या विभागातील सर्व सदस्य प्राध्यापक,प्राध्यापिका यांनी सहकार्य केले.संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे साहेब तसेच अध्यक्ष प्रातिनिधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी सर,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यकमासाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments