समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे या तंत्रनिकेतन महाविद्यालयात नुकतेच तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग व मेकॅट्रॉनिक्स इंजिनियरिंग विभागाच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.
ओबी एनर्जी रिसर्च एंटरप्राइजेस या समूहाचे संस्थापक संभाजी कदम हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,प्रा.संजय कंधारे,सर्व विभागप्रमुख,शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना एमबीडेड सिस्टीम आणि इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, त्याचा वापर कसा व कुठे करावा याबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले.इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमेशन संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे व किट यामध्ये एम्बिडेड सिस्टीमचा वापर कसा केला जातो याबाबत चे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले.
आरडीनो सॉफ्टवेअर बाबतचे मूलभूत आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा वापर कसा करावा,आरडीनो संलग्न उपकरणे ड्रायव्हिंग एलईडी,एलसीडी,रिले,कीबोर्ड यांची इंटरफेसिंग कशी करावी याचे सखोल मार्गदर्शन सहभागी विद्यार्थ्यांना करण्यात आले.
सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मेकॅटॉनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागाच्या प्रा.संदीप त्रिभुवन,प्रा.शिल्पा वाजे,प्रा.प्रणाली थोरात,प्रा.भाग्यश्री शेळके यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेकॅटॉनिक्स इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.श्याम फुलपगारे यांनी तसेच प्रास्ताविक समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले यांनी तर आभार इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते यांनी मानले.


Post a Comment
0 Comments