Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत



चारोळ्या 


गांधी जगाला कळलं

आम्हांसि अजून नाही

गांधींना ओळखण्याची -

आपलीच कां चूक ही ?


विदेशात गांधी प्रिय

भारतात कां अप्रिय ?

गांधी इतका संघर्ष

सांगा कुणी केलं काय ?


देश निधर्मी म्हणतो

धर्मात विष कशाला ?

माणूस म्हणून जगी -

माणूस पुसून गेला 


आज देश बिघडला

समाजही दुभंगला

माणसातला माणूस

कुठे दिसेनासा झाला


वाघाच्या पंजात , कधी -

मगरीच्या जबड्यात

देश आपला आजचा

रोज नव्या संकटात

 कवी - सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments