आज सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलमे,ता.जुन्नर येथील शाळेत डीसेंट फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने "कळी उमलताना" हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी मुलींना मार्गदर्शन करताना डॉक्टर पुष्पलता शिंदे बोलत होत्या. त्यांनी मुलींना शारीरिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, स्वसंरक्षण, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबाबत मार्गदर्शन केले. समाजामध्ये वावरत असताना अनेक वाईट प्रवृत्तीचे लोक आपल्याला भेटतात त्यावेळी त्यांना कसे ओळखायचे त्यांच्यापासून आपले संरक्षण कसे करायचे हेही त्यांनी मुलींना सांगितले.
तसेच डिसेंट फाऊंडेशनचे सचिव डॉ. एफ.बी. आतार यांनी मुलींना मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की कोणतीही गोष्ट आपल्या आई-वडिलांपासून लपवू नका. चांगली संगत करा, मोबाईलचा योग्य वापर करा असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी मुलींना दिला. यावेळी उपस्थित मुलींना कळी उमलताना या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई, सरपंच शितलताई फोडसे, केंद्र प्रमुख संजय जाधव, मुख्याध्यापिका स्वप्नजा मोरे, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी व माता पालक उपस्तीत होते.
Post a Comment
0 Comments