कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटणारे प्रतिभावान कार्य कृतीशील प्रशासक व्यक्तिमत्त्व प्रविण खोलंबे.यांना यावर्षीचा महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रविण खोलंबे.हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात एन.एस.बी.सैनिकी निवासी शाळेमध्ये Section Incharge या पदावर कार्यरत आहेत.सैनिकी स्कुलमध्ये नवनवीन उपक्रम राबवत असतात.विद्यार्थांचा बौद्धिक विकास कसा करता येईल याकडे त्यांचं अधिक लक्ष असतं. त्याचप्रमाणे त्याचं साहित्य क्षेत्रातीतही उल्लेखनीय योगदान आहे.सुमारे हजार हुन कविता लिहिल्या आहेत.विविध विषयांवरील वैचारिक लेखन केले आहे.नाशिक आकाशवाणी केंद्र व जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन त्यांच्या कवितांचं अभिवाचन केलं आहे.महाराष्टातात ६० हुन अधिक ठिकाणी कविसंमेलन मध्ये सहभागी.त्यांच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथुन प्रसिद्ध होणारं साप्ताहिक भगवे वादळ यांचा
यावर्षीचा महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराने सरांच्या अस्सल हिऱ्याला बावनकशी सोन्याचं छान गोंदण लाभले आहे. त्यांच्या कार्याची मोहर सदैव पुरस्कारांवर उमटत रावो...! अशा त्यांना मनस्वी शुभेच्छासह..! हार्दिक अभिनंदन...!!
Post a Comment
0 Comments