आई अंबे
आई अंबे उदे उदे
आईराजा उदे उदे
तुझे ते विराट रूप
डोळे भरून पाहू दे
आज तुझीच लेकरे
कांं जाळू पाहती देश ?
आपलेच आपल्यांचे
कां करती सर्वनाश ?
कळतच नाही कसे -
तुझी महिमा दृष्टांना ?
कशी येईल सुबुध्दी -
तमाम दृष्ट शक्तींना ?
असेच चालले तर -
दूर होईल अंधार ?
तूच सांग आम्हां आई
कशी करू सणवार ?
एकसंघ देश पुन्हा
पाहायची आहे घाई
गाभारी जाळीन माझा -
माझ्या देहाची समई
आई अंबे जगदंबे
सा-या विश्वाची तू आई
रूप तुझे पहायला
भक्तांना लागली घाई
कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना. कामून )
मो .नं .०७६२०५४०७२२
Post a Comment
0 Comments