Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



चारोळ्या

सारं काही हरूनही

जिंकल्याचाच कां भास ?

जिंकून पण चेहरा

कां वाटावेसे उदास ?


जगी वावरण्याआधी

चेहरा आपला शोधा

कुठला आपला खरा 

कुठला सरळ साधा ?


आहे तसे जगून घ्या

जगणे हेच जीवन

जगण्यात खरी मजा

दाखवा उपभोगून


काही नवे, काही जुने

रोजच येती आठव

असे किती म्हणून मी -

मनी रोज साठवावं ?


ना घर आपलं होतं

ना ती माणसे आपली

तरी आपले म्हणून

धरावी किती सावली ?

कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments