Type Here to Get Search Results !

श्री शिव छत्रपती महाविद्यालयात समुपदेशन विभागाचे उद्घाटन संपन्न.



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )

दि.१० आ़ॅक्टोबर २०२४

जुन्नर: श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर येथे समुपदेशन विभागाच्या उद्घाटनानिमित्त पुणे येथील व्यावसायिक समुपदेशक व मानसोपचारतज्ञ मा.श्रीमती रोहिणी फूलपगार यांचे 'समुपदेशनाचे महत्त्व व उपयोग' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.



याप्रसंगी बोलताना त्यांनी समुपदेशन म्हणजे काय व त्याची आवश्यकता का आहे हे स्पष्ट केले.विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडण्याची कारणे,त्याचे होणारे दुष्परिणाम आणि विद्यार्थ्यांनी आपले मानसिक आरोग्य चांगले रहावे म्हणून काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.स्वयंशिस्त,वेळेचे नियोजन,स्व-नियंत्रण याचा अवलंब केल्यास व स्वत:ला आहे तसे स्विकारल्यास नैराश्य, चीडचीड,अतिविचार या मानसिक समस्यांपासून दूर राहता येते असे त्या म्हणाल्या.मनातील अनामिक भिती व नैराश्य टाळण्यासाठी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा व त्यासाठी मेडिटेशन करावे असेही त्यांनी सांगितले.



या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याविषयी जाणून घेणे व सध्याच्या ताणतणावाच्या जीवनशैलीत आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करणे किती आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डा़ॅ.रविंद्र चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा.प्रतिभा लोढा,पर्यवेक्षक प्रा.समीर श्रीमंते, कला विभाग प्रमुख प्रा.राजेश कांबळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.अन्नपुर्णा ढोले व समुपदेशन विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समुपदेशन विभागाच्या सर्व सदस्य प्राध्यापक,प्राध्यापिका यांनी प्रयत्न केले.संस्थेचे अध्यक्ष मा.अ़ॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी सर व सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशन विभागाच्या प्रमुख प्रा.संध्या बनसोडे यांनी केले,तर पाहुण्यांचा परिचय प्रा.राजेश कांबळे यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा.कविता शिंदे यांनी केले, तर प्रा.वर्षा बनकर यांनी आभार व्यक्त केले.फलकलेखन श्री.कुमार सुर्यवंशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments