Type Here to Get Search Results !

डिसेंट फाउंडेशन तर्फे नवरात्रोत्सवात जागर स्त्रीच्या आरोग्याचा.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )

आज शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी डिसेंट फाउंडेशन पुणे व नवतरुण गणेशोत्सव मंडळ जुन्नर यांच्या वतीने जुन्नर येथे किशोरवयीन मुली व महिलांसाठी मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅडचा वापर व विल्हेवाट तसेच ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. प्रिया करडीले व डॉ. शीतल शिंदे यांनी मासिक पाळीत घ्यावयाची काळजी व चांगला स्पर्श - वाईट स्पर्श या विषयावर मार्गदर्शन केले. तर एडव्होकेट लक्ष्मी घुटे व एडव्होकेट प्रगती शिंदे यांनी लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम व बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर मार्गदर्शन केले. तर पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीषा ताम्हाणे यांनी स्व-संरक्षण याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच यावेळी २७ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली व कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. नवरात्र उत्सवामध्ये सार्वजनिक मंडळांनी असे आरोग्य विषयक उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मत यावेळी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी व्यक्त केले.



याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण, श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्राचे संस्थापक दीपक चव्हाण, अध्यक्ष अरुण शेरकर, डॉ. शिवानी थोरात,अँडव्होकेत गायत्री चव्हाण, तपासणी तज्ञ सपना बेलवटे, संगीता करडीले,योगेश वाघचौरे,अभिजित सुरगुडे आदी मान्यवर किशोरवयीन मुली व माता पालक उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज फाउंडेशन चे संस्थापक श्रीकांत जाधव यांनी केले. प्रास्ताविक डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉ. एफ. बी. आतार यांनी केले तर आभार राजश्री शिवले यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments