चारोळ्या
आई सहज कळते -
बाप कळत नसतो !
आईचं दिसतं तसं -
बापाचा कुठे दिसतो ?
सुखाला कसली चिंता -
उगीच जाळतो चिता !
दुःखाला चिंता-काळजी -
कारण कुटुंब मोठा !
आपण सगळे एक -
फक्त सण-उत्सवाला !
सणवार संपले की -
दुरावा मग कशाला ?
पोटाच्या खळगीसाठी -
माणूस करतो काय ?
कमरेखालची जागा -
मोकाट सोडतो काय ?
गरिबीचा काय दोष -
गरिबीत असण्याचा ?
आज असेल गरिबी -
उद्या ताज श्रीमंतीचा !
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments