Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



चारोळ्या 


मरण इतकं  स्वस्त -

जीवन कां महाग ही ?

मरणासवे जीवन -

स्वस्त कसं होत नाही ?


आज नाही तर उद्या -

सत्याचे जग येईल !

तेंव्हा खोट्यांची हालत -

मरणासन्न होईल !


आपला कठीण काळ -

आपली घेतो परीक्षा ?

आपण किती लायक -

ठरवू पाहते कक्षा !


कुणी उंच आकाशात -

कुणी स्वप्नातच दंग !

वास्वव जगात आज -

वास्तवात कोण मग ?


जगात चालले काय -

कुणाही काही कळेना !

शोधून पहाया पण -

कुणी पुढेही येईना !

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments