@ चारोळ्या @
माणसासवे वागावे
माणसाचे गाणे गावे !
आणि माणूस म्हणून -
माणूसधर्म पाळावे !
मिरची खाऊनपण -
पोपट गोड बोलतो !
माणूस गोड खावून -
कडवट कां बोलतो ?
फक्त एकदाची हार
नका होऊ कमजोर !
जिंकायची जिद ठेवा
अंगी हिंमत जोवर !
यशस्वी झालात तर -
नका जाऊ हुरळून !
हरलात तर पुन्हा -
प्रयत्न करा जोमानं !
चांगलं असण्यापेक्षा -
चागलं दिसणं और !
चांगलं दिसण्यापेक्षा -
चांगलं वागणं और !
कठीण असलं तरी -
अशक्य नसतं काही !
प्रयत्न कराल तर -
अशक्य शरण येई !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना.कामून )
मो.नं. 07620540722
Post a Comment
0 Comments