प्रतिनिधी | प्रा. प्रविण ताजणे सर
भारतातील समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बेल्हे,या शैक्षणिक संस्थेचा बटान पेनिन्सुला स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यासोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
शैक्षणिक देवाणघेवाण आणि सहयोगी संशोधन उपक्रमांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
बटान पेनिन्सुला स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व करताना विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी सेवांचे उपाध्यक्ष प्रो.एड्रियन सी.पेर्डियो;आंतरराष्ट्रीय संबंध कार्यालयाचे संचालक डॉ.जोआन डी.लोब्रिनो;तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डीन डॉ.रोवेना बी.व्हॅलेरियो;पदवीधर महाविद्यालयाचे डीन डॉ.एरियल ए.बोंगको;आणि ओराणी कॅम्पसचे डीन ऑफ इंस्ट्रक्शन डॉ.अलोन्झो एल.मोर्टेजो आदी मान्यवर उपस्थित होते.
समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे रिसर्च,इनोवेशन अँड इंटरनॅशनलाईजेशन सेलचे संचालक डॉ.प्रतिक मुणगेकर यांनी समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
डीन व्हॅलेरियो यांनी बीपीएसयूच्या मुख्य कॅम्पसमध्ये सर्वांचे स्वागत केले.
दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांचा,संसाधनांचा आणि सुविधांचा आढावा एकमेकांशी शेअर केला.डॉ.मुणगेकर यांनी समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या प्रभावशाली प्रगतीवर प्रकाश टाकत,विशेषतः अवघ्या चार महिन्यांत चार अत्याधुनिक प्रयोगशाळांची स्थापना केल्याचे सांगितले.यामध्ये रोबोटिक्स,ड्रोन तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि अंतराळ तंत्रज्ञानातील अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.
प्रो.पेर्डिओ यांनी या कामगिरीचे कौतुक केले आणि संभाव्य एक्सचेंज प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष अनुभव प्रदान करण्याच्या कार्यक्रमाबाबत डॉ.मुणगेकर यांच्याशी सहमती दर्शविली.
आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.या उपक्रमामुळे शैक्षणिक व्याख्याने,प्राध्यापक आणि विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम आणि दोन्ही संस्थांच्या शैक्षणिक गुणवत्तेला समृद्ध करणारे उपक्रम घेण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध होईल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्राध्यापक,संशोधक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण;संयुक्त संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम; शैक्षणिक संसाधनांची देवाणघेवाण; क्रेडिट ट्रान्सफर कार्यक्रम; शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभाग; आणि प्रकाशनांची देवाणघेवाण या सर्व उपक्रमांचा या शैक्षणिक सामंजस्य करारामध्ये अंतर्भाव होत असल्याने सर्वांगीण प्रगतीसाठी हा सामंजस्य करार अतिशय फलदायी ठरणार आहे.
हा सामंजस्य करार केवळ शैक्षणिक प्रगती आणि आंतरराष्ट्रीय संबंधांपुरता मर्यादित नसून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि सुव्यवस्थित गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नांदी आहे.
सदरचा सामंजस्य करार संपन्न झाल्याने संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,रिसर्च इनोवेशन अँड इंटरनॅशनलायझेशन सेलचे संचालक डॉ.प्रतिक मुणगेकर,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments