Type Here to Get Search Results !

कवी सुरेश शिर्के लिखित लोककल्याणकारी राजश्री छत्रपती शाहू महाराज ("काव्यांजली")


 

लोककल्याणकारी राजश्री छत्रपती शाहू महाराज.

("काव्यांजली")


दीनांचे कैवारी

मदतीचा दिला हात

दैन्यावर मात

शाहूंची!-----१


समाज सुधारक

सर्वांगी केला विकास

प्रगतीची कास

मोलाची!-----२


निराधारांना आधार

छत्रपती शाहू महाराजांचे

वाली दीन-दुबळ्यांचे

महाराज!-----३


स्त्रियांचा विकास

सतीप्रथा केली बंद

कलेचा छंद

वाढविला!-----४


फुलेंच्या नंतर

पेटती ठेवली ज्योत

कार्याची सतत

राजश्रीने!-----५


 सुरेश शिर्के

खारघर,पनवेल

Post a Comment

0 Comments