Type Here to Get Search Results !

कवी प्रा पल्लवी रासकर लिखित काव्य रचना बाईपण



बाई हे एक नुसतं नाव नसतं

प्रत्येकाच्या घरातलं ते घरपण असतं 

किणकिणणारऱ्या बांगड्यांचा नाद असतं 

पायात छुमछुमणारं पैंजण असतं

बाई हे दोन घरांमधलं एक वेगळंच नातं असतं 

मुलगी, बहीण ,पत्नी ,आई असं निभवणारं नातं असतं 

बाई हे एक संसारात बुडालेली नाव असतं 

प्रत्येकाच्या घरातील लक्ष्मीचे एक पाऊल असतं 

माता सरस्वतीने दिलेलं ज्ञानाचं भांडार असतं 

स्वयंपाक घरातील अन्नपूर्णेचा वास असतं 

संसाररूपी रथाचे एक मजबूत चाक असतं 

निर्मितीचे वरदान मिळालेलं एक बीज असतं 

बाई हे प्रत्येकाच्या घरातलं एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व असतं.


कवयित्रीचे नाव-पल्लवी बाळासाहेब शिंदे. 

श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर

Post a Comment

0 Comments