रिमझिम धारा...("नवकाव्य" काव्यप्रकार)
पावसात
रिमझिम धारा
संगतीला वारा
वाहे...१
मातीचा
सुगंध सुटला
आनंद दाटला
मनांत...२
वीजही
नभी कडाडली
जणु वाजवली
ढोलकी...३
मोरानीही
फुलविला पिसारा
चैतन्याचा पसारा
चोहीकडे...४
बळीराजा
प्रफुल्लीत झाला
लगबगे निघाला
शेताकडे...५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments