प्रतिनिधी घोडेगाव | सुरंजन काळे
घोडेगाव (ता आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्नील घोडेकर यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच आश्विनी तिटकारे व सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी अलका राहणे यांनी काम पाहिले.
उपसरपंच कपिल सोमवंशी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी 17 पैकी 11 सदस्य उपस्थित होते. ह्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. निवडी नंतर स्वप्नील घोडेकर यांचा सत्कार माजी सभापती कैलासबुवा काळे व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोमनाथ काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सभापती सखाराम घोडेकर, सखाराम पाटील काळे उपस्थित होते. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावचा विकास करणार असल्याचे तसेच गावातील रस्ते ; व कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावणार असे निवडीनंतर श्री घोडेकर यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments