Type Here to Get Search Results !

कवी सुरेश शिर्के लिखित काव्य रचना सुंदर सकाळ

 


सुंदर सकाळ ("हायकू"जपानी काव्यप्रकार)


सुंदर सकाळ

पहाटेचा हा काळ

मनोहरम...१


लाल लालीमा

उषःचा हा महिमा

क्षितिजावर...२


आकाश धरा

सुर्य येई आकारा

त्यांच्या मिलनी...३


वाटे ह्या मना

येई छान ललना

भूमीवरती...४


सौंदर्यवती

ह्या धरणीवरती

अवतरली...५


परमानंद

सर्वांनाच पसंद

आरंभ वेळी...६


चैतन्य घुमे

नतमस्तक मने

जनाजनांची...७


सुरेश शिर्के

खारघर,पनवेल

Post a Comment

0 Comments