*म्हणून मी नेहमी आनंदी असतो*
मी भुतकाळ चघळत नाही
ना मी भविष्याची चिंता करतो
मी वर्तमानात जगतो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो*
मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही
मी कुणाबद्दल राग मनात
धरत नाही
मी लगेच सगळ्यांना माफ करतो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो*
मी कसलाच हव्यास आणि लोभ करत नाही
बकरी सारखा मी दिवसभर
चरत नाही
मी समाधानी राहुन
फक्त दोन वेळाच खातो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो*
मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही
आपुलकीची आणि मैत्रीची किम्मत नसणाऱ्यासाठी कधीच दुःखानेतडफडत नाही
साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो*
कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही
कोणी काहीही बोलल तरी
पुन्हा मी ते स्मरत नाही
माझे जीवन स्वछंदी आहे
ते मी मजेत जगतो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो*
मला ना पदाचा ना ज्ञानाचा
अहंकार कधी मला
तुच्छतेचा विचार कधी
मनाला नाही भावला
पाय जमिनीवर ठेऊन प्रसंगी
अनवाणी चालतो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो*
जगायला काहीच भौतिक
सुख लागत नाही
म्हणून मी गर्वाने कधीच
वागत नाही
सगळ्यांशी प्रेमाने आदराने
आपुलकीने वागतो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो*
जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे ही जाणीव आहे
माझ्यातही दोष आहेत आणि
काहीतरी नक्कीच उणीव
आहे
माझे दोष मी रोजच पाहुन
सुधारण्याचा प्रयत्न करतो
*म्हणून मी नेहमी आनंदी असतो*
कवयित्री -प्राध्यापिका पल्लवी बाळासाहेब शिंदे.
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.
Post a Comment
0 Comments