आबा ची करोना काळात नोकरी गेली होती तेव्हा पासून तो चांदणी चौकात नीरा विकण्याचा व्यवसाय
करत आहे.गेल्या आठवड्यात दुपारी व्यवसाय करत
असताना एक शेतकरी आपल्या बायकोला घेऊन जाताना वाटेत ओरडून सांगत होता."मला कोणी तरी
मदत करा.मला बायको घेऊन दवाखान्यात जायचे
आहे." पण कोणी तिकडे लक्ष देत नव्हते.
तो शेतकरी आबा जवळ येऊन म्हणाला. ".भाऊ बघाना !मी इतका वेळ प्रयत्न केला पण
कोणी ही आपले वहान थांबविले नाही.ईथे रिक्षा ही
मिळत नाही.माझी बायको पोठुशी आहे.कोणत्याही
परिस्थिती त तिला दवाखान्यात दाखल असे वाटते "
रस्त्याने अनेक वहाने जात होती पण गरीबाला
मदत करण्यासाठी कोणाला वेळ नव्हता.प्रत्येक जण
स्वतःच्या धुंदीत मग्न होता.आबा ला त्या शेतकऱ्याची
कीव आली..आबा म्हणाला "थांब थोडा,बघ आता मी काय करतो."
निवडणुकीचे दिवस होते.मंत्र्यांच्या गाड्या प्रचारासाठी जाताना दिसत होत्या.शेतकर्याची बायको
ओरडून सांगत होती.आता वेदना सहन होत नाही.आबा हे बघून अस्वस्थ झाला.तेवड्यात एक गाड्यांचा ताफा पुण्याकडे रवाना होणार असे दिसत होते.आबाने एक दगड घेतला.जोरात त्याने दगड भिरकावला.तो एका गाडीवर आदळला.खळम-खटाक आवाज झाला.सर्व गाड्या एकदम थांबल्या.मंत्र्यांच्या गाडी वर दगड आदळला होता.पोलीस आले."दगड कोणी मारला?"
आबा "मी मारला ! .प्रथम त्या माऊलीला दवाखान्यात
घेऊन जा.ती पोठुशी आहे .ईथे एकतर वहान मिळत नाही." पोलिस माऊली कडे बघून एका गाडीने तिला
दवाखान्यात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. पोलिसांनी आबा स चौकशी साठी बरोबर घेतले.
मंत्री गाडीतून उतरुन बघीतले मामला जरा अडचणी चा आहे.त्यांनी हुकुम दिला "आबा स दम द्दा आणि परत दगड फेक करणार नाही असे वदवून घ्या"
आबा मनोमनी खुष झाला .आपलं आयुष्य सार्थकी लागले.दोन दिवसानी शेतकरी आठवणी ने पेढे घेऊन आबास भेटायला आला.शेतकरी "लय उपकार भाऊ, तुमच्या मुळे माझी बाय सुखरूप आहे.मुलगा झाला.पोट फाडून पोरास बाहेर काढले डाॅक्टर नी."
आबा मनास समजावत होता.देवतारी त्यास कोण
मारी !
कमलाकांत जाधव
मुलुंड (पुर्व)
मोबाईल:-९९६९४२५१५६

Post a Comment
0 Comments