"बळीराजा नी पाऊस"
बळीराजा माझा जगाचा पोशिंदा आहे तो
सुख-समृद्धी येण्यासाठी शेतात राबतो तो
ऊन असो की पाऊस शेतात घामाचे मोती गाळतो तो
पिक जोमात येण्यासाठी पावसाची वाट बघतो तो
जेव्हा गरज असते तेव्हा वाट बघायला लावतो तो
उगाच नकळत शेतकऱ्याची परीक्षाच घेत असतो तो
पीक मोठे होण्यासाठी अपार कष्ट घेतो तो
भूक तहान देखील विसरतो तो
पीक कापण्या योग्य झाल्यावर आनंदी होतो तो
आनंदी झाल्यावर कांदा नी भाकरी गोड मानून खातो तो
पण अवकाळी पाऊस आल्यावर नाराज मात्र होतो तो
हा अवकाळी पाऊस मोत्याचीही माती करतो हो
म्हणून या अवकाळी पावसाला माझी विनंती का बरे असे करतो तो?
कधी माझा बळीराजा आनंदाने जगेल हो
कधीतरी त्याच्या पिकाला योग्य भाव मिळेल हो
भारत देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे तो
सर्वांना असा आनंद देणारा माझा बळीराजा कधी सुखाने दोन घास खाईल हो.
कवयित्री-प्रा.सौ. पल्लवी निलेश रासकर.
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.
Post a Comment
0 Comments