शिवशंभो...
वाजवी डमरू
तांडव हा करी
भयंकर अति
जेव्हा क्रोध भारी.....१
भोला हा शंकर
शीघ्र हा प्रसन्न
जग भल्यासाठी
विषाचे प्राशन.....२
हा प्रलयकारी
दुष्ट संहारक
अति हा दयाळु
भक्तांचा तारक.....३
बेलाची आवड
असे जटाधारी
पूजा करतात
त्याची सोमवारी.....४
गणपती पिता
हा त्रिनेत्रधारी
पार्वतीचा पती
भाली चंद्रधारी.....५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments