Type Here to Get Search Results !

समर्थ संकुलात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून "कळी उमलताना" कार्यक्रमाचे आयोजन



प्रतिनिधी : प्रविण ताजणे सर

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने “कळी उमलताना” या आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

यावेळी डॉ.सुनीता आवारी यांनी मुलींना शारीरिक आरोग्य,वैयक्तिक स्वच्छता,मासिक पाळीत घ्यावायची काळजी,आहार,व्यायाम,पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड चा वापर व विल्हेवाट याबाबत सखोल मार्गदर्शन केले.मासिक पाळी हे निसर्गचक्र आहे.मासिक पाळी बाबत असलेले समज-गैरसमज याबाबत त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.



डिसेंट फाउंडेशन चे सचिव डॉ.फकीर आतार यांनी मुलींना मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन करत असताना चांगली संगत करा,मोबाईलचा योग्य वापर करा,आई-वडील हे आपले दैवत आहेत.आपल्या एखाद्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांना समाजात शरमेने आपली मान खाली घालावी लागेल असे वागू नका असा वडीलकीचा सल्ला दिला.

आळेफाटा पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल ज्योती दहिफळे म्हणाल्या कि,समाजातील वाईट प्रवृत्ती ओळखा.गुड टच-बॅड टच म्हणजेच चांगला स्पर्श किंवा वाईट स्पर्श समजून घ्या.आपल्याबाबत काही चुकीचे घडून येत आहे हे लक्षात आल्यास आपल्या आई-वडिलांना वेळीच सांगा,जेणेकरून त्यावर तात्काळ उपाययोजना करता येईल.

ॲडव्होकेट गायत्री चव्हाण यांनी मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन केले. 

यावेळी मुलींना डिसेंट फाउंडेशनच्या वतीने "कळी उमलताना" या मार्गदर्शक पुस्तिकेचे मोफत वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके,समर्थ शैक्षणिक संकुलाच्या संचालिका सारिकाताई शेळके,डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई,संचालक आदिनाथ चव्हाण,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई आहेर,समर्थ गुरुकुलचे प्राचार्य प्रा.सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,योगेश वाघचौरे तसेच मातापालक व संकुलातील किशोरवायीन मुली उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी स्नेहल ढोले,मनीषा शेळके,दीप्ती चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली नवले यांनी,प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार योजना औटी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments