Type Here to Get Search Results !

कवी प्रा. पल्लवी रासकर लिखित काव्य रचना "रस्ता मात्र एकच"

 


"रस्ता मात्र एकच"


रस्ता मात्र एकच..

रस्त्यावरून प्रवास करणारे मात्र वेगवेगळे, 

श्रीमंत असो की गरीब, 

मनुष्य असो की प्राणी..

रस्ता मात्र एकच...

ध्येये मात्र वेगवेगळी 

पण रस्ता मात्र एकच..

ध्येयपूर्तीसाठी मनुष्य धावतो 

पण रस्ता मात्र पुढेच पुढे जातो 

ध्येये पूर्ण करता करता रस्ता मात्र जिंकतो,

मनुष्य मात्र आयुष्यभर धावतच राहतो 

पण त्याला ठाऊकच नाही जिंकण्यासाठी, 

रस्ता मात्र एकच..

आयुष्यात जिंकण्यासाठी निराश तू होऊ नकोस,

हे भल्या माणसा ध्येयपूर्तीसाठी लक्षात तू ठेव 

ध्येये जरी अनेक.... 

पण रस्ता मात्र एकच. 


कवयित्री-सौ पल्लवी निलेश रासकर 

श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.

Post a Comment

0 Comments