प्रतिनिधी : पंकज सरोदे
भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुक्यात वर्षावास प्रवचन मालिका राबविण्यात आली आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा यामध्ये आंबेगाव तालुका शाखेतर्फे वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात येते त्याच निमित्ताने रविवार दि २७/०७/२०२५ रोजी तालुक्यात विविध ठिकाणी प्रवचन मालिका राबविण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने पंचशील बुद्ध विहार घोडेगाव, सिद्धार्थ सेवा मंडळ आमोंडी, सिद्धार्थ बुद्ध विहार पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, बौद्ध विकास तरुण मित्र मंडळ वळती, बौद्ध उत्कर्ष मंडळ & माता रमाई महिला संघ चांडोली बुद्रुक, याठिकाणी भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत, महाबोधी विहार आणि बौद्धांची पवित्र स्थळे या विषयावर धम्म प्रवचन पार पडले.
धम्म प्रवचनास प्रवचनकार म्हणून आद. रवींद्र अभंग (संस्कार उपाध्यक्ष पुणे जिल्हा पच्छिम ) आद. वैभव भवार (संस्कार सचिव पुणे जिल्हा पच्छिम ) आद. महेश वाघमारे (अध्यक्ष आंबेगाव ता ) आद. नरेश कसबे (कोषाध्यक्ष आंबेगाव ता ) गणेश वाघमारे (संस्कार उपाध्यक्ष आंबेगाव ता ) अतिश ढोणे (प्रचार पर्यटन आंबेगाव ता ) अक्षय साळवे (संस्कार सचिव आंबेगाव ता ) यांनी धम्म प्रवचन केले.
प्रवचन मालिकेचा निमित्ताने समता सैनिक दल यांनी सकाळी परेड करण्यात आली व मानवंदना दिली त्यास आद. तान्हाजी आस्वारे (संरक्षण उपाध्यक्ष, सैनिक आंबेगाव ता) आद. गौतम खळे (संरक्षण सचिव आंबेगाव ता ) राजू शेवाळे (संरक्षण सचिव) त्याचप्रमाणे सैनिक उपस्थित होते.
या प्रवचन मालिकेस आद. पंकज सरोदे (वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट अध्यक्ष ) आद. लहू लव्हांडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्याध्यक्ष आंबेगाव ता ) यांनी या धम्म प्रवचनास उपस्थित उपासक, उपासिका यांचे आभार मानले...
Post a Comment
0 Comments