पाऊसधारा
रिमझिम पाऊस
हा पडू लागला
ओले चिंब चिब
सर्वां आनंद झाला...१
थुईथूई मोर हा
पहा नाचू लागला
सुंदर मोरपिसारा
नाचता फुलला...२
तरू वेली संगे
वारा खेळू लागला
किलबिल पक्ष्यांनी
मधूर स्वर छेडला...३
सप्तरंगी इंद्रधनु
आभाळी दिसला
रिमझिम सांजवेळी
रंगखेळ हा झाला...४
खळखळ सळसळ
मेळ हा जमला
वाहती ती सरिता
मिळाली सागराला...५
प्रेमयुगूलांचा आता
जमला हा मेळा
वाटे प्रेमसागर हा
प्रेमात तो रंगला...६
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

Post a Comment
0 Comments