घोडेगाव वार्ताहर | सुरंजन काळे
आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, घोडेगाव मध्ये स्काऊट गाईड विभाग व घोडेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सौ. रश्मी भुजबळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कु. परिणीती बारवे या विद्यार्थिनीने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाविषयी माहिती सांगितली कु. नील गुंजाळ याने स्वरचित झाडे जगवा, झाडे लावा यावरील एक कविता सादर केली. क्रीडा विभाग प्रमुख सौ .ज्योती रोकडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा. सरपंच सौ.अश्विनीताई तिटकारे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण बाबत मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत सदस्या सौ. संगीताताई भागवत यादेखील या कार्यक्रमास उपस्थित होत्या .तेजश्री येंधे यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच सौ.सुनिता वाजे , श्री.संतान असांगी,श्री.विजय काळे सर, श्री.उदय बेंढारी व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. श्री.तुकाराम काळे, उपाध्यक्ष एडवोकेट श्री कार्याध्यक्ष सुरेश काळे संस्थेचे सचिव श्री विश्वासराव काळे न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल चेअरमन मा. श्री. बाळासाहेब काळे, संस्थेचे खजिनदार मा. श्री सोमनाथ काळे, संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी श्री प्रशांत काळे,समन्वय समिती चेअरमन श्री राजेश काळे, वस्तीगृह कमिटी चेअरमन श्री सूर्यकांत गांधी, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल चेअरमन मा. श्री. बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक श्री अजित काळे श्री अक्षय काळे, श्री वैभव काळे,प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी, पर्यवेक्षिका श्रीमती वंदना वायकर यांनी मार्गदर्शन केले.
Post a Comment
0 Comments