प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
प्राथमिक शाळा उदापूर शाळेतील विद्यार्थ्यांनी दि- 12 जुलै 2025 वार-शनिवार रोजी निवडणुकीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शाळेत 4 थी पर्यंतचे वर्ग असून सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या अनुभवासाठी शाळेत शालेय मुख्यमंत्री निवडीसाठी मतदान घेण्यात आले. सदर निवडणुकीसाठी ४ विद्यार्थ्यांनी उमेदवारी भरली होती. त्यापैकी कु.आर्या अमित म्हसणे या विद्यार्थ्यानीची बहुमताने निवड करण्यात आली.निवडणुकीच्या अगोदर विद्यार्थ्यांना उमेदवारी साठी २ दिवस सांगण्यात आले.नंतर विद्यार्थ्यांना आवडीनुसार चिन्ह वाटप करण्यात आले. सर्व इच्छुक उमेदवारांनी सर्व विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी घेऊन आपण मुख्यमंत्री पदासाठी कसे योग्य आहोत आणि शालेय कामकाजासाठी आपण इतरांना कसे सहकार्य करणार याबाबत माहिती दिली. त्यानंतर मतदानाच्या दिवशी सर्व शिक्षकांनी मतदार यादी तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला मतदान पत्रिका उपलब्ध करून दिली.उमेदवारांची मतदान पत्रिका फोटो व चिन्हासाहित तयार करण्यात आली.
प्रत्यक्ष मतदानासाठी मतदान कक्ष तयार करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातावर शाई लावण्यात आली. गोपनीय मतदान प्रक्रियेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या मतदान पत्रिकांची मोजणी करून विजयी उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले.व मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. सदर मतदान प्रक्रियेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले. अशी माहिती शाळेचे मुख्या श्रीम. माणिक फापाळे यांनी दिली. शालेय निवडणुकीमध्ये श्री सत्यवान म्हस्के, श्री सुनील चौधरी, सौ उर्मिला चौधरी या शिक्षकांनी सहभाग व परिश्रम घेतले.निवडणुक झाल्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वैभव बुगदे,शबाना शेख व सर्व उपस्थित व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या हस्ते विजयी उमेदवाराचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. सदर प्रसंगी पत्रकार श्री रविंद्र भोर,श्री.पराग जगताप, श्री.दुष्यंत बनकर या सर्व पत्रकारांनी निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तेजस नेटवर्क व शिक्षणा फाउंडेशन चे समन्वयक कृष्णा दुधवडे व सुरज जाधव यांचे सहकार्य लाभले.सर्व पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना निवडणुकीबाबत जागृत करून योग्य उमेदवाराला मतदान करण्यासाठी प्रेरणा दिली तसेच गावाचे पोलिस पाटील अमित ठोसर यांनी सदर निवडणुकीच्या कामकाजाची पाहणी केली. ग्रामस्थांनी शिक्षकांनी केलेल्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. सदर उपक्रमासाठी केंद्रप्रमुख श्री बाळासाहेब भालेकर, विस्तार विस्तार अधिकारी श्री धोंगडे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री अशोक लांडेसाहेब यांनी प्रेरणा दिल्याचे शिक्षकांनी सांगितले तसेच उदापूर शाळेमध्ये अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम सातत्याने शिक्षक घेत असल्याबद्दल ग्रामस्थांनी सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले
Post a Comment
0 Comments