मराठा महासंघ जिल्हाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत झुंजार शिवसैनिक प्रा.अनिल निघोट यांचे आवाहन
कल्याण मध्ये परप्रांतीयाकडुन अमानुष मारहाण झालेल्या मराठी मुलीचेआई वडील दहा पंधरा वर्षांपूर्वीच मरण पावलेल्या तीन बहिणी कामाला जाऊन उदरनिर्वाह व शिक्षण घेत आहेत,ड्युटी करत असताना परप्रांतीय हैवानाकडुन लाथा घालून,केस धरून ओढत मारहाण, अवघ्या महाराष्ट्रातील मराठी मन हळहळलं, या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या परप्रांतीयाचा जाहीर निषेध!काही मुली , महिला पळवून युपी बिहार ला नेल्या, इकडं गुन्हा करून तिकडं लपुन बसायचं, तिकडं गुन्हा करून महाराष्ट्रात निर्धोक फिरायचं, टोपली,मासे, चटया , खुर्ची, भंगार,फ्रुट, साड्या कपडे काही पण विकत फिरायचं, घेणारे आपणच ना, जागोजागी मराठी माणसांच्या राज्यात राहुन इथलं खाऊन, फुकटचा फुटपाथ वापरून वर संघटीत रित्या मराठी माणसांवर हल्ले परप्रांतीय अजून कोणत्या थराला जायची वाट पहाता?
फुटपाथ हप्ते खाऊन कोण वापरु देतं, इकडचं रेशनकार्ड, आधार,मतदारयादीत नाव पैसे घेऊन कोण टाकुन देतं, ते मराठी दलालच. वर एवढं करून पोलिसांना न सापडतात मनसैनिकांनी शोध घेत झडप घालून चांगला मराठी दणका देत पोलिसांच्या हवाली केल्यावर त्यांनी कीर्ती जोडीनं ,प्रेमानं पाठीवर हात फिरवुन आयतं ताब्यात घेतले, पाहिलं ना,मागे मी हे फुकटच्या सरकारी हायवेवरील फ्रुट, ज्युस, आईस्क्रीम,खेळणी वाले हटविले तर त्यांच्यासाठी मला येणारे फोन मराठी माणसांचेच होते,का तर त्यांच्या घरात दहा दहा जण राहुन भरपुर भाडं देत होते, त्या घरमालकाच्या मित्रांचा पण फोन,यांची कधी मधी फुकट आईस्क्रीम खायला मिळते, म्हणून कशाला सर गरीबांच्या पोटावर पाय देता?, वास्तविक सांगुन रक्त सांडुन मिळवलेल्या महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसांचा, प्रत्येक खाजगी सरकारीत नव्वद टक्के हक्क मराठी माणसांचा हवा, कर्नाटक सारखा,कुणाचाही सरकार असुदे पहिलं कर्नाटक, कन्नड भाषिक,बाकी नंतर
पण महाराष्ट्रात ऊलटंच गरज नसताना हिंदी पहिलीपासून सुरू करण्यात आपलेच पुढे, बत्तीस परप्रांतीय आमदार,सात खासदार यांचेच,आता शिवसेना मराठी माणसांचा ठसा मुंबई,ठाणे,वसई, मिरा भाईंदर, पनवेल कल्याण, भिवंडी सगळीकडे उद्योगधंद्यांत नव्वद टक्के परप्रांतीय,अगदी मंचर घ्या मोठ्या ऊदयोगात पण का तर म्हणे मराठी माणसांना जास्त पगार लागतो,दिला तर हे लगेच भिकारी होणार का?यांची उत्पादनं मराठी माणुसच घेतो की हे परप्रांतीय ते दहा पंधरा जण एकत्र च रहात असल्याने खर्च कमी, म्हणून आता सगळीकडे तेच, नफ्यासाठी का ही मराठी माणसांचा न्याय्य हक्क डावलून परप्रांतीयांची भरती करुन कमावलेली संपत्ती बरोबर नेणारेत का? यात पण परभाषिक व्यावसायिक आघाडीवर ,त्यांनी फेकलेल्या तुकडयांवर दलाली करणारी आपलीच, मग मराठी कामगार नसले, कितीही ओढे नाले कालवे,नद्या प्रदूषित करत असले तरी चालेल! आपल्याच आईच्या गळ्याला नख लावणारे हे मराठी माणसांतील राजकारणी दलाल महाराष्ट्र लुटत, पैशांसाठी मराठी माणसांचाही बळी देत आहे.
एक भाजपचा दुबे मराठी माणसांना पटक पटक के मारेंगे म्हणतो तर मनसे, शिवसेना सोडून कुणी ब्र शब्द काढला नाही, का तर तो आपला केला गुन्हा दाखल? वर गरीब हिंदूंना का मारता म्हणताना श्रीधर नाईक, रमेश गोवेकर हिंदू नव्हते का?
म्हणे संविधानाने भारतात कुठेही रहाणे, व्यवसाय स्वातंत्र्य दिलंय,मग गोव्यात का परमिट लागतं? बरं हे उत्तर भारतीय नेते एवढे बोंबलतात तर त्यांच्या माणसांचं पोट तीथं का भरता येत नाही.
महाराष्ट्रात राहून, व्यवसाय नोकरी करताना आपल्याशी हिंदीतच बोलणार,आपण पण हिंदीतच , कुठं गेला मराठीचा अभिमान,आपली मातृभाषा संपवायची का? त्यांच्या दुकानात ते हिंदीतच बोलणार मराठीत बोला म्हटलं तर त्यांना राग येतो,आपण कितीही मराठी त बोललो तरी ते हिंदीतच बोलणार,का आपण त्यांना मराठी चा एवढा दुस्वास अन् मराठी शिकायची बोलायचीच नसेल तर कशाला जाता? जाणून बुजून हिंदीच बोलुन वर मराठी आती नही,क्या करना है करो हे बिनधास्त बोलतात,ते कर्नाटक, तामिळनाडू तर ही मिजास दाखवुन शकतील? तीचं मातृभाषा मराठी असणारांवर कन्नड सक्ती एवढं प्रेम, आपण मात्र हिंदी सक्ती करुन मोकळे,वर भाजप, शिंदे सेनेकडून समर्थन! मराठी माणुस पेटुन उठल्यावर शेपटी आत घातली, मराठी महाराष्ट्रद्रोही सरकार असो वा मराठी दलाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दात कानाखाली आवाज ऊठलाच पाहिजे, सरकारी जागेत, फुटपाथ, हायवे , सिग्नल , गल्ली बोळात,वाड्या वस्त्यात विनापरवाना धंदा अनेक ठिकाणी करत असलेल्या परप्रांतीयांवर कारवाई करा, आणि मराठी माणसांच्याच विरोधात उभे रहाणारा पकडुन वस्तू खरेदी, कामाला,भाड्याने ठेवणं टाळुन मातृभाषा मराठी व महाराष्ट्र या मातृभुमी ची सेवा करून दोन हजार वर्षाचा इतिहास असलेल्या अभिजात मराठीची अवहेलना करत टिंगल करुन व्यवसायाचं निमित्त करत हिंदी लादुन मराठीचा गळा घोटणार असेल तर यांच्यावर अन् साथ देणारांवर बहिष्कार च टाकलेला बरा.
वर कोण महाराष्ट्रात गुजराती भाषेत आमदारकीची ,चौकाची पाटी लावून मराठीस तुच्छ समजत असेल तर मिरा भाईंदर सारखं मुंग्या जसं वारुळातुन बाहेर पडुन शत्रूस पळवून लावतात तसं या मराठी महाराष्ट्र द्रोहयांविरुद्ध एकी दाखवण्याची गरज आहे,नाहीतर पुढच्या पिढीला आधी मराठी आमची मातृभाषा होती,आणि मराठी लोकांचा आधी महाराष्ट्र होता असे म्हणायची वेळ भविष्यात येईल.
प्रा.अनिल निघोट मंचर
जिल्हाप्रमुख, पुणे जिल्हा.आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ,
मा तालुकाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना, आंबेगाव
Post a Comment
0 Comments