जीवन बैलगाडी
बैलगाडी हे जीवन
बैलजोडी खिल्लारी
वाजे घुंगरू खुळूक
गावाकडे निघे स्वारी.....१
पती-पत्नी दोन चाके
जीवनात त्या गाड्याचे
गाड्यावरी ओझे जड
अंताकडे निघायचे.....२
बैल कष्टाचे प्रतीक
रस्ता मार्ग जीवनाचा
खेच खेचूनच ओझे
मार्ग पार करायचा.....३
असे हलके हलके
ओझे वर गवताचे
तसा संसाराचा भार
जीवनात मानायचे.....४
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

Post a Comment
0 Comments