Type Here to Get Search Results !

समर्थ अभियांत्रिकीच्या ११९ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड.



प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११९ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली असून सिव्हिल इंजिनिअरिंग मधील दत्तप्रसाद महाले या विद्यार्थ्याला यावर्षीचे सर्वाधिक १८.२९ लाखाचे पॅकेज मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी दिली.

ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातून ४५ विद्यार्थ्यांची टी सी एस,आयबीएन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड,बिट्स अँड बाईट्स सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड,बजाज फीनसर्व्ह,पीएचएन टेक्नॉलॉजी,एलटीआय माइंड ट्री,टेक्नोग्रोथ सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर यांनी दिली.तसेच १० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तर १९ विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करत आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातून १८ विद्यार्थ्यांची फ्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद,अँटॉलीन लाइटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,सिरमा एसजीएस लिमिटेड रांजणगाव,अबेरडेर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड,सनश्री प्रायव्हेट लिमिटेड,संदीप इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑटोमेशन,आर्या ओमनीटोल्क वायरलेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी यांनी दिली.स्वतःचा व्यवसाय सुरू केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ असून उर्वरित विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत.

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातून ८ विद्यार्थ्यांची टाटा पावर पुणे,टाटा पॉवर सोलापूर,कमिंस पुणे,नीपेन इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट,सिग्मा इंजिनियर सोल्युशन पुणे,जीई इंडिया इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड पुणे आदी कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती विभागप्रमुख प्रा.निलेश नागरे यांनी दिली.तसेच २ विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून सर्वच २० विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिकल,जे बी आय एल सर्किट इंडिया,बजाज ऑटो,बॉश चासिस इंडिया प्रा.लिमिटेड,टाटा टेक्नॉलॉजी,मदरसन इंडिया,टाटा मोटर्स,सिंडोक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,इंडस्ट्रियल पॅकर्स,जीके इंजिनियर्स,वनास इंजिनियर्स,सिद्धेश्वर इंजिनियर्स,माईलस्टोन प्रायव्हेट लिमिटेड आदि कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती विभागप्रमुख प्रा.अमोल खतोडे यांनी दिली.

सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून २४ विद्यार्थ्यांची अदानी ग्रुप मुंबई,गोदरेज प्रॉपर्टीज,सिध इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे,डी मेटल्स अँड इंजिनियर्स रांजणगाव,रुद्र कन्स्ट्रक्शन,आकाश कन्स्ट्रक्शन,एस आर कन्स्ट्रक्शन,पी एस कुमार इन्फ्रा, महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन,सिंघानी क्रियेटर्स प्रायव्हेट लिमिटेड आदि कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती विभाग प्रमुख प्रा.अमोल भोर यांनी दिली.

या सर्व प्लेसमेंट समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात येत असून जापनीज लैंग्वेज,जर्मन लैंग्वेज,रोबोटिक्स,ड्रोन टेक्नॉलॉजी,हॅकॅथॉन,प्रोजेक्ट कॉम्पिटिशन तसेच विविध कार्यशाळा,सेमिनार व एक्सपर्ट लेक्चरचे आयोजन केले जाते.त्याचप्रमाणे मुलाखतीसाठी आवश्यक असलेले सॉफ्ट स्किल ट्रेनिंग,इंग्लिश कम्युनिकेशन ट्रेनिंग,ॲप्टीट्यूड ट्रेनिंग इत्यादी बाबतचे प्रशिक्षण ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अंतर्गत दिले जात असल्याची माहिती ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी दिली.

निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विभागप्रमुख,शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments