आळंदी देवाची: भारत ह्युमन राईट फाउंडेशनच्या आज देवाची आळंदी येथे फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार देवकाते यांचे हस्ते प्रा.अनिल निघोट व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रा.अनिल नारायण निघोट निघोटवाडी मंचर येथील रहिवासी असून प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, महाविद्यालय व पदव्युत्तर असा तीस वर्षे अध्यापनाचा अनुभव असुन दोन हजारांवर शिक्षक प्राध्यापक , मुख्याध्यापक, प्राचार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षकांप्रमाणेच शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवले असुन विविध क्षेत्रात सेवा बजावत आहे, प्रा.अनिल निघोट यांनीही अडीच हजार पेक्षा जास्त शिष्यवृत्ती, नवोदय,दहावी, बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिक जबाबदारी म्हणून ट्राफी, स्कूल बैग, शालेय साहित्य देऊन गुणवंतांचा गौरव केला असुन पाचशे पेक्षा जास्त मान्यवरांना आंबेगाव तालुका भुषण, समाज भुषण, पत्रकार भुषण पुरस्कार व कारसेवक ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार केला असून शिवजयंती, धर्मवीर संभाजी महाराज,महाराणा प्रताप जयंती,नेताजी सुभाषचंद्र बोस,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती ते प्रत्येक वर्षी साजरी करत असतात आजही शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक अनिल निघोट काम करत असुन वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आजतागायत स्वतः ही शिक्षण घेत असुन एम.ए.सहा विषयात, एम.एड.,एम.फिल व तीन विषयांत सेट पात्र असुन सतत तीन वर्षे टि इ.टी., शिक्षक अभियोग्यता गुणवत्ता यादीत आले असून, महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विभागात मुख्याध्यापक,डाएट च्या अधिव्याख्याता उत्तीर्ण असुन आज शिक्षणाधिकारी पदांवर कार्यरत असते,पण सरकारी अनुदानित नोकरी करायची नसल्याने गुणवत्ता यादीत येऊनही न स्वीकारता विनाअनुदानित वर च काम करत असल्याचे प्रा.निघोट यांनी सांगितले, सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी पदवीसाठी आपले फायनल संशोधन कार्य सादर केले असून, आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी ओरीएंटेशन कार्यक्रम,तीन रिफ्रेशर कोर्स,तीन शार्ट टर्म कोर्स, दिडशे वर चर्चासत्र, सेमिनार,वेबिनार,कान्फरन्स केल्या असून, अभ्यासक्रम निर्मिती वर्कशाप, तसेच पंधराहुन जास्त संशोधनपेपर सादर केले असून सर्वत्र त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत असुन,यातुन शिक्षणक्षेत्रात अजून माहिती ज्ञान व शिकण्यास प्रेरणा मिळाली असून ईतरांनी सुद्धा जास्तीत जास्त शिक्षण घेऊन भारतमातेची समाजाची सेवा करावी असे प्रा अनिल निघोट यांनी आवाहन करुन सर्वांचे आभार मानले

Post a Comment
0 Comments