आला श्रावण ("मधुसिंधू"काव्यप्रकार)
आला श्रावण
वर्षा धारा सवे
झाले ते हिरवे
हे रानवण...१
सुटला वारा
मस्तीत धुंदीत
न्हाऊन निघत
सर्व हि धरा...२
चैतन्य नवे
सृष्टीत आकारा
आनंद हा सारा
मनाला भावे...३
निसर्ग खुले
रंग संगतीत
भर सौंदर्यात
मन हे झुले...४
सण-उत्सव
आले सुर घेत
निघे वरातीत
उत्साह नव...५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

Post a Comment
0 Comments